पंजाब सरकार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधील चर्चा निष्फळ

चंदीगड : ऊस उत्पादक शेतकरी आणि पंजाब सरकार यांदरम्यान चंदीगडमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. उसाचा राज्य हमीभाव (एसएपी) ठरविण्याच्या मुद्यावरून दोन्ही घटकांमध्ये जवळपास ९० मिनिटे चर्चा सुरू राहिली. सरकारकडून सहभागी झालेले तज्ज्ञ उसाच्या ठराविक दरावर अडून राहिले. तर शेतकरी संघटनेने आपल्या हिशोबाने दर वाढविण्याची मागणी कायम ठेवली.

यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनी उसाचा उत्पादन खर्च ३५० रुपये येत असल्याचे सांगितले. तर शेतकऱ्यांनी उस उत्पादनासाठी प्रती क्विंटल ३८८ रुपये खर्च येत असल्याचे सांगण्यात आले. हरियाणात सरकारने ऊस उत्पादन खर्च ३५८ रुपये निश्चित शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, सरकारने शेतकऱ्यांनी मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर आता पुन्हा जालंधरमध्ये तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत उसाचा उत्पादन खर्च नव्याने काढण्याचे ठरले आहे.

सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले की जालंधरमध्ये पुन्हा बैठक होणार आहे. त्यामध्ये कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आणि शेतकरी संघटनांचे तज्ज्ञ यांच्यामध्ये उत्पादन खर्चाबाबत चर्चा होईल. या बैठकीतील निर्णय मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाईल. त्यानंतर सरकारची शेतकरी संघटनांसोबत पुन्हा चंदीगडमध्ये बैठक होईल. अधिकाऱ्यांनी २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. उसाची थकबाकी पुढील पंधरा दिवसांत दिली जाईल असेही सांगण्यात आले. सहकारी कारखान्यांची थकबाकी एक सप्टेंबरपर्यंत मिळेल असेही यावेळी सांगण्यात आले. शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू ठेवण्याची आणि रेल्वेमार्ग रोखण्याची घोषणा केली. शेतकरी नेते मनजीत सिंह यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. उसाचा दर प्रती क्विंटल ४०० रुपये करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here