तामिळनाडू: चक्रीवादळ निवार मुळे झालेेल्या पीकांच्या नुकसानीचे आकलन सुरु

चेन्नई, तामिळनाडू: राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी चक्रीवादळ निवार ला पहता तामिळनाडू मध्ये पिकाच्या नुकसानीचे सुरुवातीचे आकलन सुरु केले आहे. 26 नोंव्हेंबर ला चक्रीवादळामुळे कुड्डलोर, अरियालुर, चेंगलपट्टू, चेन्नई आणि तिरुवन्नमलाई सह तामिळनाडू आणि पुदुचेरी च्या अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, चक्रीवादळ निवार मुळे नुकसान झालेल्या विविध जिल्ह्यातील पीकांचा प्रस्ताव मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांना पाठवला जाईल. रानीपेट जिल्ह्यामध्ये एकूण नुकसानीचा सुरुवातीचा अंदाज जवळपास 3.10 करोड रुपये आहे आणि जिल्ह्यामध्ये तांदळासह 5,734 एकरामध्ये उगवलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्हा कलेक्टर ए. आर. ग्लैडस्टोन पुष्पराज यांनी चितनजी, पुठुप्पडी आणि नंदीवल्लम गावातील नुकसान झालेल्या पीकांचे निरीक्षण केले. तिरुवन्नामलाई जिल्ह्यामध्ये कांदा पिकवणार्‍या शेतकर्‍यांनी सांगितले की, संततधार पावसामुळे आणि निवारमुळे पीक सडले आहे.

विल्लुपुरम जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे तांदुळ, डाळ, भुईमुग, उस सारखी पीके जलमग्न झाली आहेत. जिल्हा अधिकार्‍यांनी काढलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, 9,000 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये पीकांचे नुकसान झाले आहे. तामिळनाडू शेतकरी संघाने राज्य सरकारला पीकाच्या नुकसानीचे योग्य मूल्यांकन करुन योग्य नुकसान भरपाई निश्‍चित करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here