तामिळनाडू : साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

चेन्नई : डीएमके सरकारने ऊसाला प्रती टन ४००० रुपये प्रोत्साहन रुपात देण्याचे आपले निवडणुकीतील आश्वासन पूर्व करावे अशी मागणी करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी चेन्नईत निदर्शने केली. शेतकऱ्यंनी अंबुर, अलंगनल्लूर आणि थलैगनैयरु येथे तीन सहकारी कारखाने पुन्हा सुरू करावेत आणि कारखान्यांनी २००० कोटी रुपयांची थकबाकी त्वरीत द्यावी अशी मागणी केली.

Tamil Nadu Farmers’ Association चे महासचिव पी. षण्मुगम यांनी सांगितले की, अलिकडेच सरकारने आपल्या निवडणूक घोषणापत्रात ऊसाला ४००० रुपये प्रती टन दर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी प्रोत्साहन म्हणून २.५० रुपये प्रती टन दरवाढ केली आहे. ही दरवाढ खते आणि शेतीच्या इतर खर्चासाठी पुरेशी नाही. ही दरवाढ शेतकऱ्यांप्रती सरकारची मदत करण्याची इच्छा दर्शवते. राज्यात ५ लाखाहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी आहेत. भातानंतर ते राज्यातील द्वितीय क्रमांकाचे कृषी उत्पादक आहेत. त्यासाठी सरकारने आश्वासन पूर्ती केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here