तमीळनाडू: ऊसासह इतर पिकांच्या नुकसानीबद्दल ५.७७ कोटींची भरपाई

मदुराई : जिल्ह्यात अलीकडे झालेल्या अवकाळी पावसात ५६०७.७२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे ५७९८ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अशा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. सरकारच्यावतीने त्यांना ५.७७ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण बैठकीत ही माहिती देण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी व्ही. विष्णू म्हणाले, शेतकऱ्यांनी ३८,४२७ हेक्टरवर भात, ६०२ हेक्टरवर बाजरी, ७४९४ हेक्टरवर हरभरा, ६६३ हेक्टरवर कापूस, ३३ हेक्टरवर ऊस, ४७४ हेक्टरवर तीळ अशी पिके लावली होती. जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ही पिके जमीनदोस्त झाली. ऊस आणि इतर पिकांना मोठा फटका बसला.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पथकांनी आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर आता ५७९८ शेतकऱ्यांना ५.७७ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here