धर्मपुरी : तामीळनाडूतील काही जिल्ह्यांतील घटलेला जलस्तर हा चिंतेचा विषय बनला आहे. याबाबत द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धर्मपुरी जिल्ह्यात आठ धरणांमध्ये केवळ ४० टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. पाण्याच्या कमतरतेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीला पाणी देणे ही एक मोठी समस्या बनली आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, विहिरीचे पाणी उचलणे हे उन्हाळ्यात शेतीकामातील अडथळा ठरतो. धर्मपूरी जिल्ह्यात आठ धरणे आहेत. त्यांची एकूण क्षमता १७८४ Mcft आहे. मात्र, सद्यस्थितीत केवळ ४० टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. ऊन्ह कडक झाल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की बदलत्या वातावरणात बोरअवेल आणि विहिरींचे पाणी मिळवणे हा चिंतेचा विषय बनला आहे. पाणी कमी उपलब्ध झाल्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
द न्यू इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना पालाकोडमधील के. के. राजेंद्रन म्हणाले की, पुलिकराय तलाव हा एक चांगला जलस्त्रोत होता. मात्र एक दशकापूर्वी ही स्थिती होती. गेल्या दशकभरात आमच्याकडे शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी कोणतेही धरण अथवा पर्याय नाही. आम्ही खरेतर दरवर्षी या काळात ऊस लागणीची तयारी करतो. पण आता आम्ही हे थांबवले आहे. कारण पाणी मिळेत की नाही हे स्पष्ट झालेले नाही.