तामिळनाडू : धर्मपुरीत उसावरील पांढऱ्या अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी धास्तावले

धर्मपुरी : विभागातील हरुर आणि मोरापूरसह परिसरातील उसावर पांढऱ्या अळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या अत्यल्प प्रमाणाने या किडीचा फैलाव झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या किडीमुळे ऊस उत्पादनात जवळपास ५० टक्के घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उसाचे उत्पादन घातल्यास त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऊस उत्पादक संघटनेचे खजिनदार एस. के. अण्णादुराई म्हणाले कि, परिसरातील बहुतांश ऊस पिकावर पांढऱ्या अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. नदुपट्टी, ठासर हळ्ळीसह परिसरातील उसावर जास्त प्रादुर्भाव झाल्याचा पाहायला मिळत आहे. या भागात एकरी ऊस उत्पादन सरासरी ३० टन आहे. मात्र, हे उत्पादन निम्म्याने घटेल अशी शक्यता आहे. शेतकरी आर. कलिप्पन यांनी सांगितले की, ऊस लागवड ही खर्चिक आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आम्ही शेतकऱ्यांनी यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. आता या किडीमुळे उसातील पाणी शोषले जाते. यातून जास्त नुकसान होण्याची भिती व्यक्त केली.

हारूरमधील शेतकरी पी. कृष्णन म्हणाले की, या किडीच्या फैलावानंतर उसाची पाने आधी पिवळी आणि नंतर पांढरी होत आहेत. उसाच्या मुळांना अळी कुरतडत असल्याने ऊस वाळतो. उसामधील रस कमी झाल्याने साखर कारखान्यांचा उतारा कमी होणार आहे. सुब्रमण्यम शिवा साखर कारखान्याचा साखर उतारा १० टक्के आहे. मात्र, यंदा तेवढा साखर उतारा कायम राहील, अशी शक्यता नाही.

सुब्रमण्यम शिवा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. प्रिया यांनी सांगितले की, कमी पावसाने या अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील गावांमध्ये याचा सर्व्हे सुरू केला आहे. अळीच्या नियंत्रणासाठी उपाय योजना राबविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here