तामिळनाडू : राज्य सरकारकडून इतर राज्यातून गुळ खरेदीने स्थानिक उत्पादक हवालदिल

धर्मपुरी : पोंगल सणासाठी केवळ तीन आठवडे शिल्लक आहे. आणि तामीळनाडूतील गुळ उत्पादकांची चिंता वाढली आहे. राज्य सरकारने त्यांच्याकडून गुळ खरेदी केलेली नाही. गुळ उत्पादकांनी सरकारला स्थानिक युनिटकडून गूळ खरेदी करणे आणि ग्रामीण व्यवसायाला मदत करण्याचा आग्रह केला आहे. पोंगल हॅम्परमध्ये सहभागी २१ वस्तूंमध्ये गुळाचा समावेश आहे. पीडीएस कार्डधारकांना हे हॅम्पर मोफत केले जाते.

धर्मपुरी ऊस आणि गुळ उत्पादक संघाचे (डीएसजेपीए) कोषाध्यक्ष चिन्नास्वामी यांनी दि न्यू इंडियन एक्स्पेसशी बोलताना सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून ऊसाचे उत्पादन घटल्याने तसेच कामगारांच्या खर्चात वाढ झाल्याने गुळ व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गुळाचा व्यापार प्रभावित झाला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पोंगल गिफ्ट हॅम्परमध्ये एक किलो गुळाचा समावेश करण्याची घोषणा केली होती. मात्र, राज्यातील युनिटकडून गुळ खरेदी केला जात नाही. जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा हा गुळ कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांकडून खरेदी केल्याचे आढळले. जर आपल्या राज्यात गुळाचे अतिरिक्त उत्पादन होते तर तो इतर राज्यांकडून खरेदी करण्याचे कारणच काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

डीएसजेपीएचे अध्यक्ष पी. कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, सद्यस्थितीत आमचा बाजारभाव ४५ रुपये प्रती किलो आहे. एका गुळच्या युनिटमधून एका दिवसात एक टन गुळाचे उत्पादन केले जाऊ शकते. धर्मपुरीत अशा ६३ हून अधिक युनिट आहेत. प्रती दिन सुमारे ६३ टन गुळाचे उत्पादन केले जाते. ही उत्पादन क्षमता लक्षात घेऊन धर्मपुरीतील लोकांना पुरवठा करण्यासाठी पुरेसा गूळ उपलब्ध आहे. अशाच पद्धतीने सेलम, वेल्लोरसारख्या इतर जिल्ह्यांतही गुळाचे अधिक उत्पादन होते. खरेतर आतापर्यंत स्थानिक युनिटकडून सरकारने गूळ खरेदी केल्याची घटना नाही. त्यामुळे स्थिती निराशाजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here