तमिलनाडु लॉरी ओनर्स एसोसिएशन ची डीजेलच्या वाढलेल्या किंमतीं विरोधात निदर्शने 

94

चेन्नई: तमिलनाडु लॉरी ओनर्स एसोसिएशन ने शुक्रवारी डीजेल च्या दरवाढीविरोधात निदर्शने केली आणि डिजेलला माल आणि सेवा करांतर्गत आणण्याची मागणी केली. तमिलनाडु लॉरी एसोसिएशन चे अध्यक्ष यश युवराज यांनी सांगितले की, इंधनाच्या वाढत्या दरामुळे लॉरी चालकांना काम करणे अवघड झाले आहे. ते म्हणाले, असोसिएशन आपल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रयत्नात केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपले बिल ही पाठवत आहे.

युवराज म्हणाले, सतत होणाऱ्या दरवाढीमुळे आम्ही काम करण्यास असमर्थ आहोत. हा विरोध केवळ लॉरी मालकांसाठी नाही, जर डिजेलच्या किंमती वाढल्या, तर त्याचा सर्वांवरच परिणाम होतो. गेल्या 25 दिवसांपासून डिजेलची सातत्याने दर वाढ होत आहे. त्यामुळे आम्ही याला विरोध करत आहोत. आमचे चालक पीडित आहेत आणि यासाठी डिजेल दरवाढ करु नये अशी आग्रही मागणी सरकारकडे करत आहोत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here