तामीळनाडू: कमी ऊस पुरवठ्यामुळे साखर कारखान्यांचे कामकाज विस्कळीत

188

चेन्नई : ऊसाच्या तुटवड्यामुळे चालू हंगामात तामीळनाडूतील साखर कारखान्यांनी कमी काम केले आहे. ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या हंगामात केवळ २८ साखर कारखान्यांनी गाळप केले. यापैकी १२ सहकारी, २ सार्वजनिक आणि १४ खासगी कारखान्यांनी कामकाज केले. राज्यात एकूण ४२ कारखाने आहेत. त्यामध्ये १६ सहकारी, दोन सार्वजनिक आणि चार खासगी क्षेत्रातील कारखाने आहेत. राज्यातील कारखान्यांनी ९.१२ सरासरी उताऱ्यासह ७२.४९ लाख टन साखरेचे गाळप केले आहे. या कारखान्यांनी ३१ मे २०२१ पर्यंत ६.६७ लाख टन साखर उत्पादन केले आहे.

गेल्या चार हंगामात उच्च प्रतीच्या नव्या प्रजातीची अनुपलब्धता, मान्सूनची अनिश्चितता, शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ, शेतीसाठीच्या कामगारांची कमतरता आणि उसाच्या स्थिर दरामुळे राज्यातील उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसमोर गंभीर आर्थिक संकट आहे. कारखाने शेतकऱ्यांना वेळेत उसाचे पैसे देण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र, २०२० मध्ये चांगल्या पावसाने (९८४.६ मिमी) तामीळनाडू सरकारने २०२०-२१ या हंगामात उसाच्या क्षेत्रात १.२५ लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here