तामीळनाडू: पावसामुळे ३०० एकरातील पिके उद्धवस्त

53

पेराम्बलुर : तामीळनाडूत पावसाचा कहर सुरुच आहे. पेराम्बलुर जिल्ह्यातील मलैयालाईपट्टी गावात सतत सुरू असलेल्या पावसाने ३०० एकराहून अधिक क्षेत्रातील शाळू, हळद, रताळीसह इतर पिके नष्ट झाली आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे. पचाईमलाई डोंगरातील तलहटी येथील मलैयालपट्टी गावात २५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या पावसाने कल्लारू परिसरात भेगा पडल्या. परिणामी शेती पाण्यात बुडाली आहे.

तामीलगा विवासयगल संगमचे जिल्हा सचिव व्ही. नीलकंडन यांनी सांगितले की, मी १.५ एकरात रताळ्याचे पिक घेतले हते. त्यासाठी एकरी साठ हजार रुपये खर्च आला आहे. पुढील महिन्यात मी पिकाची कापणी करणार होतो. मात्र, दुर्दैवाने या पावसाने हे पिक नष्ट झाले आहे. पाणी अद्याप शेतात आहे. जर मी पाणी काढले तरीही पिक वाचवू शकणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या पिकाची पाहणी करावी आणि किमान ५०,००० रुपये प्रती एकर नुकसान भरपाई द्यावी. अशीच स्थिती परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.

दरम्यान, शेती विभागाचे उपसंचालक एम. इंदिरा यांनी सांगितले की, पाऊस थांबल्यानंतर महसूल विभाग पिकांची पाहणी करेल आणि योग्य नुकसान भरपाई देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here