चेन्नई : राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरी संघाच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी आपल्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हस्तक्षेप करावा या मागणीसाठी निदर्शने केली. शेतकऱ्यांनी हातात ऊस घेऊन राज्य सचिवालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. नंतर शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली.
द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी आरोप केला की, खासगी साखर कारखान्यांनी परवानगीशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर कर्जे घेतली आहेत. त्यामुळे बँका शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत. नोटिसा पाठवत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक प्रमाणपत्र जारी करण्याची मागणी सरकारकडे केली. शेतकऱ्यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही, याची स्पष्टता करण्याची मागणी केली. तरच कायदेशीर कारवाईतून सुटका होऊ शकते. या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत.