तामिळनाडू : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

तंजावर : तिरुमंदकुडी येथील खासगी साखर कारखान्याविरोधात आंदोलन करत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना निवेदन दिले. तंजावूर जिल्ह्यातील थिरुमन कुडी येथे खासगी साखर कारखाना परिसरात शेतकरी गेल्या २५० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. कारखाना पुन्हा सुरू करण्याआधी आधीच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या नावे घेतलेल्या बँक कर्जाचा मुद्दा सोडवला जावा अशी त्यांची मागणी आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटून आपल्या दुर्दशेबाबत माहिती देण्याचे आंदोलनकर्त्यांचे प्रयत्न सुरुवातीला अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी दुपरी कुंभकोणममध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तंजावर जिल्हा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या मयिलादुथुराई दौऱ्यादरम्यान, सालियमंगलम जंक्शनवर शेतकऱ्यांशी त्यांची भेट घालून दिली.

आंदोलनकर्त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सालियमंगलम जंक्शनवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खासगी साखर कारखाना व्यवस्थापनाद्वारे त्यांच्यावर लादले गेलेले कर्ज आणि त्याची परतफेड यात हस्तक्षेप करण्याची मागणी करत आपले निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here