तमिळनाडू : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तंजावरमध्ये आंदोलन

तंजावर : थिरुमंडनकूडीमध्ये एका खासगी साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून पाठवलेल्या उसाचे पैसे देण्यास उशीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पापनासम तालुक्यातील सरुक्काई गावात निदर्शने केली.
द हिंदू डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, खासगी साखर कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या नावावर बँकांकडून कर्ज घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना धोका दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी सरुक्काईमध्ये खासगी साखर कारखान्याच्या १०० एकर जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांनी त्रिपक्षीय बैठकीच्या माध्यमातून हा मुद्दा सोडविण्याचा पुढील १५ दिवसांत प्रयत्न केला जाईल असे सांगून आंदोलनकर्त्यांना शांत केले.

यांदरम्यान, कृषी कॉलेज आणि संशोधन संस्था तसेच अरिग्नर अन्ना साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस एक्स्पो २०२१च्या अंतर्गत २२ सप्टेंबर रोजी ऊसाच्या शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरण या विषयावर चर्चासत्र झाले. तंजावर जिल्ह्यातील ४०० हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संस्थेच्या परिसरात आयोजित केलेल्या ऊस एक्स्पोमध्ये सहभाग घेतला. येथे शेतकऱ्यांसाठी मशिनरीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एक्स्पोचे उद्घाटन एसीआरआयचे डीन ए. वेलायुधम यांनी केले. ज्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकतेमध्ये चांगले उत्पादन मिळवले आहे, कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा केला आहे, अशा शेतकऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी एस सेल्वासुरबी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here