तमीळनाडू: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पूर्ण थकबाकी

मदुरई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. अलंगनल्लूर येथील नॅशनल को ऑपरेटिव्ह शुगर मिल्सने शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार २००८-०९ या गळीत हंगामातील फायद्यातून २६६९ शेतकऱ्यांना १.१८ कोटी रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, २०१५-१६ मधील एसएपीमधील थकीत १०.७३ कोटी रुपयांचेही पूर्तता केली जाणार आहे.

तमीळनाडू ऊस शेतकरी संघाचे राज्य अध्यक्ष एन. पलानीचामी यांनी सांगितले की, २०१६-१७ या हंगामातील ७ कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांना देय आहेत. शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलने केल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांची थकबाकी देण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून अलंगनल्लूर साखर कारखान्यात गाळप सुरू नसल्याने चिंतेत होते. आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यांच्या उसाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आम्हाला ऊस पाठविण्यास उशीर होतो. त्यातून ऊसाचे वजन घटण्याची समस्या येते. याशिवाय, ट्रक चालक जादा दिवसांसाठी जादा पैसे घेतात. त्यामुळे सरकारने अलंगनल्लूर साखर कारखान्याने गाळप करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here