तामिळनाडू: मरयूरमध्ये कामगारांच्या टंचाईमुळे ऊस तोडणीस उशीर

चेन्नई : कामगारांच्या तुटवड्यामुळे वेळेवर तोडणी न झाल्याने मरयूरमधील शेतामध्ये अद्याप ऊस शिल्लक आहे. कामगारांच्या टंचाईमुळे ऊस तोडणीस उशीर होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वेळेवर ऊस तोडणी होत नसल्याने रसही कमी येईल. त्यामुळे गुळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. ऊसाच्या वाढीचा कालावधी जवळपास १२ महिने असतो. याशिवाय कमी उत्पादन असूनही गुळाचे दर कमी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मरयूरमधील स्थानिक युनिट्सकडून गुळाचे उत्पादन केले जाते. त्यासाठी जीऑग्राफिकल इंडिकेशनही देण्यात आले आहे. मरयूर करीमपुलपाडका विपणन संघ, मॅप्को (मरयूर कृषी उत्पादन कंपनी) आणि मरयूर हिल्स कृषी विकास सोसायटी या तीन एजन्सींना गूळ विक्रीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्याला मरयूर गूळाचे ब्रँडनेम देण्यात आले आहे.

एमएचएडीएसचे प्रमुख सेल्विन मरप्पन यांनी सांगितले की, सरकारने ओणम टीकमध्ये मरयूर गुळाचा समावेश केलेला नाही. सबरीमालामध्ये अरवाना तयार करण्यासाठी आणि अंगणवाड्यांना पुरवठ्या करण्यासाठी गूळाचा समावेश करण्याची मागणी केली होती. तामिळनाडूचा कनिष्ठ प्रतीचा गुळाचे मरयूर गुळाच्या ब्रँडखाली पॅकिंग केले जात असल्याचीही तक्रार त्यांनी केली आहे. गेल्यावर्षी ओणमच्या कालावधीत मरयूर गुळाच्या ५० किलोच्या पोत्याला ४,१०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here