टांझानिया: पंतप्रधानांनी घातली झांझीबारमधील साखर आयातीवर बंदी

209

टांझानिया सरकारने झांझीबार द्विपसमूहात साखरेच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. टांझानियाचे पंतप्रदान कासिम माजलिवा यांनी 19 जानेवारीला ही बंदी घातली होती. ते म्हणाले, महोंदा शुगर फॅक्टरी लिमिटेडचा साठा विक्री होईपर्यंत झांझीबारला कोणतीही साखर आयात करण्याची परवानगी दिली जावू नये.

झांझीबार मधील महोंदा शुगर हा एकमेव साखर उत्पादक असून 20,000 टन उत्पादनाच्या क्षमतेच्या तुलनेत वर्षाकाठी 6,000 मेट्रीक टन साखर उत्पादन होते. झांझीबारमध्ये साखरेचा वापर 36,000 टन आहे. आयातीवरील बंदीचे लक्ष्य स्थानिक साखर उत्पादकाचे संरक्षण करणे आहे. शिवाय स्वस्त साखरेमुळे साखर बाजारपेठ तोट्यात आहे. 2019-20 च्या हंगामात, महोंदा शुगरने 2,800 टन साखर विक्री केली. त्यात अद्याप साखर साठा 3,200 टन इतका आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here