टांझानिया: बखरेसा समुहाचा साखर कारखाना जून २०२२ मध्ये सुरू होणार

दार एस सलाम : सईद सलीम बखरेसा ग्रुप ऑफ कंपनीजने (SSBG) अलिकडेच जाहीर केले आहे की $300 मिलियन गुंतवणुकीचा बागमायो साखर कारखाना अधिकृतरित्या पुढील वर्षी, जून २०२२ पर्यंत उत्पादन सुरू करू शकेल.
बखरेसा समुहाच्या कॉर्पोरेट विभागाचे संचालक हुसैन सुफियान यांनी सांगितले की, साखर कारखान्याने पहिल्या टप्प्यात १०० मिलियन डॉलर (सुमारे २३० अब्ज डॉलर) खर्च केले आहेत. आम्ही नागरी सेवांशी निगडीत कामे पूर्ण करीत आहोत. आणि पहिल्या टप्प्यातील त्यासाठीचा खर्च ११० मिलियन डॉलरचा असेल. आम्ही आता मशिनरी बसविण्यास सुरुवात केली आहे. सर्वसाधारणपणे ही प्रक्रिया सहा ते नऊ महिन्यांची असेल.

सुफियान म्हणाले, मशीनची स्थापना या वर्षी डिसेंबर अखेर अथवा पुढील वर्षी जानेवारीपर्यंत तयार होऊ शकेल. जून महिन्यात व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यापूर्वी साखरेचे परीक्षण, उत्पादन केले जाईल. तीन टप्प्यातील या योजनेची क्षमता ३०,००० ते ३५,००० टनाच्या आसपास असेल. बागमायो शुगर लिमिटेडच्या पहिल्या टप्प्यात साधारणतः ८०० ते १००० प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here