टांझानिया: साखर उत्पादन वाढवण्यसाठी बँकेचे सहकार्य

डोडोमा : सीआयडीबी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अब्दुलमाजिद नसेकेला यांनी या आठवड्यात व्यवस्थापक मंडळ आणि मुख्य व्यवस्थापन अधिकार्‍यांसह कगेरासाखर कारखान्याचा दौरा केला. ते म्हणाले, आर्थिक विकासाच्या दिशेने योगदान देणे आणि घरगुती बाजारात साखरेच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी कगेरा साखर कारखान्याला आपल्या बेसिक पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. घरगुती उद्योगांच्या आर्थिक वृध्दीमुळे आम्ही वास्तविक त्यांना घरगुती आणि विदेशी बाजारांसाठी विकसित करणे आणि आर्थिक विकासामध्ये योगदान करण्यामध्ये सक्षम बनवत आहोत.

नसेकेला म्हणाले, घरगुती साखरेची मागणी वाढत आहे, यासाठी कारखान्यानि आपली क्षमता वाढवावी आणि ज्या बँकांजवळ आर्थिक साधन आहे, त्यांच्या बरोबर करार करावा. सीआयडीबी प्रमुख म्हणाले, आम्ही ग्राहकांसोबत नियमित रुपात चर्चा करतो आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कगेरा साखर कारखान्याचा दौरा करत आहोत. जेणेकरुन आम्ही त्यांच्या आवश्यकतांबाबत माहिती घेवू शकू आणि नंतर त्यांचे निराकरण करु शकू.

कगेरा साखर कारखान्याचे सीईओ अश्‍विन रन्ना यांनी 100 मिलियन च्या कर्जासाठी सीआयडीबी चे कौतुक केले. ज्यामुळे कारखान्याचे अस्तित्व अबाधित राहिले. शेकडो लोकांना रोजगार मिळाला आणि करोडोंची थकबाकीही भागवली. ते म्हणाले, सीआरडीबी कर्जामुळे आम्ही यावर्षी देखील कारखान्याला गती देण्यासाठी सर्व प्रमुख गुंतवणूक योजनांना लागू करण्यामध्ये सक्षम बनवले आहे. 2001 मध्ये कारखान्याच्या खाजगीकरणानंतर कगेरा साखर कारखान्याने आपले उत्पादन 600 टणावरून 91,000 टन प्रति वर्ष पर्यंत वाढवले होते. ते म्हणाले, आमची योजना पुढच्या पाच वर्षांच्या आत उत्पादन वाढवून 170,000 टन करायचे आहे, जेव्हा आम्ही 7,000 लोकांना रोजगार देवू. सीआयडीबी बोर्ड अध्यक्ष लाय म्हणाले, व्यवस्थापन नितीला दिशा देणे चालूच राहील, जेणेकरुन बँक राष्ट्रीय विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभवेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here