टांझानिया बनू शकते आफ्रिकेचे शुगर हब : तज्ज्ञांचा दावा

269

टांझानियामध्ये देशांतर्गत आणि औद्योगिक साखर उत्पादनाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे अशी अपेक्षा व्यापार आणि कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली. शेतीयोग्य चांगली जमीन शिल्लक आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेता येऊ शकतो. टांझानियाने जर एका धोरणाअंतर्गत काम केले तर ते आफ्रिकेचे शुगर हब बनू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशाच्या बहुतांश भागात ऊसाचे पिक येऊ शकते. मात्र, साखर उत्पादनासाठी क्षमता विकसित करण्याची गरज आहे. यासाठी अपेक्षित गुंतवणूक आणि रणनीतीची गरज आहे. त्यामध्ये ऊस उत्पादकांसह सर्व संबंधीतांचाही समावेश करता येईल.

तज्ज्ञांनी सांगितले की, साखर कारखाने, कंपन्यांकडे साखरेवर प्रक्रिया करून ऊस उत्पादकांच्या हितासाठी त्याचा उपयोग करण्याची संधी आहे. मोठ्या प्रमाणावर साखरेची आयात आणि देशांतर्गत खप या दोन्ही बाबींचा लाभ उठवण्याची संधी या उद्योगात आहे.

फेब्रुवारी महिन्यात कृषी मंत्री अडॉल्फ मकेंडा यांनी अनेक ऊस उत्पादक असूनही त्यांचे उत्पादन साखरेसाठी उपयुक्त नाही. त्यामुळे उसाची टंचाई निर्माण झाल्याचे म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here