टांझानिया: साखर उत्पादन वाढवण्याचे कारखान्यांचे प्रयत्न सुरूच

डोडोमा : सध्याची मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात साखर कारखान्यांचे ,कारखाना पुन्हा सुरु करुन उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अलीकडे अनेक कारणांमुळे साखरेचे प्रमाण घटले आहे, ज्यामुळे ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. महापूराने उत्पादनावर मोठा परिणाम केला. स्थानिक उद्योगांनी अस्थायी रुपात उत्पादन कमी केले आहे, त्यामुळे रिटेल दुकानात साखरेची तीव्र कमी आहे.बहुसंख्य उद्योग उत्पादन पुन्हा सुरु करत आहेत आणि यामुळे पुरवठ्यात वाढ आणि रिटेल किमती कमी होण्याची शक्यता आहे.
किलिमंजारो मध्ये टीपीसी साखर कंपनीने सांगितले की या हंगामामध्ये साखर उत्पादन वाढवून 97,000 मेट्रिक टन  करण्याची आशा आहे, जे गेल्या हंगामात 88,000  मेट्रिक टन इतके होते. टीपीसी चे कॉर्पोरेट कार्यकारी अधिकारी, जाफरी यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी साखरेची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने रणनिती बनवली जाते, जेणेकरून साखरेच्या मागणीला पूर्ण केले जाऊ शकते. मोशी कस्बे मध्ये स्थित साखर  रिफाइनिंग कारखान्यात साखर उत्पादना बाबतच्या हालचाली ९ जून ला पुन्हा सुरु होतील. गेल्या आठवडयात, किलोमोबेरो साखर कारखान्याने उत्पादन पुन्हा सुरु केले. ज्यामध्ये 2020-2021 हंगामा दरम्यान 127,000 टन उत्पादनाची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here