क्रांती कारखान्याचे सरासरी उत्पादन ६० टनावर नेण्याचे उद्दिष्ट : अध्यक्ष शरद लाड

सांगली : क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने राबवलेल्या पथदर्शक प्रकल्पातून उदय लाड यांनी एकरी १३१.४३४ टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले. कारखान्याने उच्चांकी उत्पादनाचे उद्दिष्ट गाठले आहे. कारखान्याचे सरासरी उत्पादन ६० टनावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. नवनवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अहोरात्र झटत आहे. आता फक्त ठराविक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणेसाठी नाही तर कार्यक्षेत्रातील एकूण सरासरी उत्पादन वाढवणेसाठी पथदर्षक प्रकल्प राबविणार आहे, असे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले.

कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी उदय लाड यांच्या शेतावर जाऊन त्यांना प्रोत्साहन दिले. लाड यांनी गेल्यावर्षी आडसाली हंगामात ३ जून रोजी को-८६०३२ या जातीची दीड एकर क्षेत्रावर क्रांती कारखान्याच्या पायलट योजनेतून लागण केली. ऊस विकास विभागाच्या सूचनेनुसार खत व्यवस्थापन केले. साडेचार फुटांवर सरी काढून, दोन फूट अंतराने एक डोळा लागण केली. वाळलेले पाचट २ वेळा काढून सरीमध्ये आच्छादन केले. उसाची वाढ नियमित राहण्यासाठी अन्नघटक, जिवाणू खते व जैव संजिवकाच्या तब्बल ७ फवारण्या घेतल्या. लाड यांच्यासह विजय जाधव, विद्युलता देशमुख, आत्माराम शिंदे, अशोक पाटील, जयप्रकाश साळुंखे आदी अनेक शेतकऱ्यांनी १०० टनावर एकरी ऊस उत्पादन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here