कोरोनाकाळात आतापर्यंत जारी करण्यात आले 98,625 करोड चे टॅक्स रिफंड

नवी दिल्ली :सीबीडीटी ने एक एप्रिल 2020 पासून 1 सप्टेंबर च्या दरम्यान जवळपास 98 हजार 625 करोड चा रिफंड जाहीर केला आहे. हे रिफंडस 26.2 लाख टॅक्स पेयर्स ना जारी केले आहेत. एकूण रिफंडमध्ये इनकम टॅक्स रिफंड चा भाग 29 हजार 997 करोड आणि कॉर्पोरेट टॅक्स चा भाग 68 हजार 628 करोड आहे.

इनकम टॅक्स च्या 24 लाख 50 हजार 41 केसमध्ये आणि कॉर्पोरेट टॅक्स च्या एक लाख 68 हजार 421 केसमध्ये रिफंड जारी करण्यात आले आहे.

कोरोना मुळे पूर्ण देशामध्ये 25 मार्चला लॉकडाउन ची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक पावले उचलली. टॅक्स विभागाला सांगण्यात आले होते की, लवकरात लवकर रिफंड जारी करावा, जेणेकरुन लोकांच्या हातात पैसे येतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here