करदात्यांनो, जलद जीएसटी परताव्या संदर्भातील बनावट संदेशांपासून सावधान

नई दिल्ली: आयकर विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाने करदात्यांना जलद परतावा मिळण्याच्या प्रलोभनांना बळी पडून कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे.

असे निदर्शनाला आले आहे की, “प्रिय करदात्यांनो, कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केंद्र सेकाराने जीएसटी परताव्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे. तुमच्या परताव्याचा दावा करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा http://Onlinefilingindia.in” असा संदेश दिसत आहे.

हा संदेश बनावट असल्याने करदात्यांना या लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण जीएसटी प्रकरणे हाताळणाऱ्या सीबीआयसी किंवा इन्फोसिसने हा संदेश पाठविलेला नाही. भेट देण्यासाठी www.gst.gov.in हे योग्य संकेतस्थळ आहे.

आयकर विभागानेही अशाच प्रकारे ट्वीट करत असे सूचित केले आहे की ते कर परताव्यासाठी कोणतेही मेल पाठवत नाहीत तसेच केवायसी तपशिलासह करदात्यांकडून मेलवर कोणतीही वैयक्तिक माहिती मागवत नाहीत.

(Source: PIIB)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here