लर्निंग मोबाईल अ‍ॅपमुळे शिक्षक होत आहेत अब्जाधीश

बायजू रविंद्रन यांंच्या बायजू या शिक्षण अ‍ॅपच्या यशामुळे भारतातील शिक्षक-एडटेक उद्योजक बनले आहेत. बायजू रवींद्रन यांनी सात वर्षांपूर्वी बायजू या नावाने लर्निंग मोबाईल अ‍ॅप तयार केले आहेे. त्यांनी बनवलेल्या अ‍ॅपची किंमत ७ .५ बिलीयन डॉलर्स असून सीएनबीसीने नोंदवले आहे की त्यांची वैयक्तिक संपत्ती १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीत त्यांचा २१ टक्के हिस्सा आहे. या कंपनीमध्ये कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा ही वाटा आहे. अभियंता होण्यापूर्वी श्री. रवींद्रन दक्षििणेकडी खेडयात वाढले . अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाळांमध्ये प्रवेश परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची आणि त्यांना मदत करण्याची कौशल्यही त्यांनी शोधून काढली.

बायजूचे – द लर्निंग अ‍ॅप हे 5 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी असून परस्पर संवादात्मक व्हिडिओ, गेम्स आणि क्विझसाठी तयार केलेले एक ऑनलाइन शिक्षण अ‍ॅप आहे.

भारतात आता त्याचे दशलक्ष सदस्य आहेत. रविंद्रन हे युके आणि अमेरिकेमध्ये डिस्नेची पात्रे वापरुन त्याचा विस्तार करणार असल्याच्या विचारात आहेत . अमेरिकन आणि ब्रिटीश शालेय अभ्यासक्रमात डिस्ने तील पात्रांचा वापर करुन बायजू लर्निंग मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जाईल .

बायजूच्या वेबसाइटने असे वर्णन केले आहे की जगातील सर्वात मौल्यवान एडटेक कंपनी आहे ज्यात 2.4 दशलक्ष सशुल्क सदस्य आहेत, जे विद्यार्थ्यांना जगाचा शोध घेण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या मार्गावर काम करण्यास शिकू शकतील, गुंतवून ठेवू शकतील असे शिक्षण मंच उपलब्ध करुन देईल.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here