हैदराबाद : दलित बंधू योजनेवर काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या लोकांना उसकवत आहेत असा आरोप टीपीसीसीचे प्रमुख ए. रेवंत रेड्डी यांनी केला.
मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवताना रेड्डी म्हणाले, सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांमध्ये ऐतिहासिक निजाम साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या आश्वासनाचे काय झाले याची उत्तरे देण्याची गरज आहे. निजामाबाद येथील शेतकऱ्यांनी टीआरएसचे नेते आणि माजी खासदार के. कविता यांचा पराभव केला होता. ज्यांनी आपली आश्वासने पाळली नाहीत, अशा लोकप्रतिनिधींचा शेतकऱ्यांनी पराभव केला आहे.
रेड्डी यांनी कम्पल्ली येथे आयोजित बोधन विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एका सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अनेकवेळा निजामाबाद सहकारी साखर कारखाना (एनसीएसएफ) पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलने केली आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link