तेलंगणा: सारंगपूर साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी

निजामाबाद : सरकार खासगी कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी स्वत:चे साखर कारखाने बंद पाडत आहे असा आरोप अखिल भारतीय किसान मजदूर संघाचे नेते वेलपुर भुमैया यांनी केला. बंद पडलेला सारंगपूर साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी १७ मार्च २०२१ पासून थिरमनपल्ली गावापासून एआयकेएमएसने कारखाना संवर्धन समितीच्यावतीने सुरू केलेली पदयात्रा गुरुवारी धिकपल्ले विभागातील धर्माराम आणि बर्दीपूर गावात पोहोचली.

भुमैया म्हणाले, सारंगपूर साखर कारखाना सुमारे २२ हजार शेतकरी आणि ५०० हून अधिक कामगारांशी जोडला गेला आहे. कारखाना बंद पडल्याने फक्त ऊस उत्पादक शेतकरीच नव्हे तर त्यावर अवलंबून असलेले हजारो लोक आपल्या उपजिविकेचे साधन गमावून बसले आहेत. शेतकरी आताही ऊस पिकविण्यास तयार आहेत असे भुमैया यांनी सांगितले. मात्र, काहीजण कारखान्याच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

यावेळी एआयकेएमएसचे नेते अकुला पापैया, कोंडेला सैरेड्डी, सिरपुर गांगरेड्डी यांच्यासह रायथू कुली संघाचे नेते नायकवाडी नरसैया, कृष्णा गौड, पीडीएसयूचे नेते राजेश्वर, प्रेमचंद यांसह शेतकरी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here