तेलंगणा : स्तम्भमपल्लीत लवकरच इथेनॉल प्लांट

हैदराबाद : धर्मपुरी विधानसभा क्षेत्रातील स्तम्भमपल्ली येथील चिन्नापती गुट्टा बोल्ला येथे इथेनॉल प्लांट सुरू केला जाणार आहे. उद्योग मंत्री के. टी. रामा राव यांनी तेलंगणा औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या इथेनॉल प्लांटसाठी लवकर जमीन निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. एका बैठकीत रामाराव यांनी धर्मपुरी विधानसभा क्षेत्रात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याबाबत सर्व संभाव्य ठिकाणांची पडताळणी केली. टीएसआयसीसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापक ई. व्यंकट नरसिंहा रेड्डी यांना यासाठी देण्यात आलेल्या जागेचा तत्काळ वापर सुरू करावा अशी सूचना केली.

यावेळी अनुसूचित जाती विकास मंत्री कोप्पुला ईश्वर आणि पेद्दापल्लीचे खासदार बी. व्यंकटेश यांनी मंत्री के. टी. रामाराव यांना धर्मपुरी विधानसभा मतदारसंघात इथेनॉल प्लांट सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here