तेलंगणा: ट्रायडंट कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

हैदराबाद : गेल्यावर्षी बंद करण्यात आलेली ट्रायडंट शुगर्स लिमिटेड पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जहीराबादमधील ऊस उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांनी या मागणीसाठी रॅलीही काढल्या आहेत. न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार ट्रायडंट शुगर्सच्या प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना तसेच कामगारांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुले कारखाना बंद पडला आहे.

कारखान्याला प्रचंड तोटा झाला असल्याचा दावा प्रशासनाचा आहे. त्यामुळे कारखाना बंद करण्यात आला. माजी आमदार दिवंगत बागा रेड्डी यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या कारखान्याचे खासगीकरण करण्यात आले होते. या काळात एन. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तेव्हापासूनच कारखान्याचा मालकी हक्क सतत बदलत राहिला आहे. कारखाना आता फक्त रिअल इस्टेटच्या मालमत्तेसाठी वापर केल्या जाणाऱ्या रुपात राहिला आहे. त्याचे मूल्य वाढत राहीले आणि मालक बदलत गेले.

याबाबत Newindianexpress.com या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ट्रायडंट शुगर्स इतर कारणांनी अनेकदा चर्चेत आली आहे. दरवेळी उसाच्या तोडणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या थकबाकीचा मुद्दा चर्चेत येतो. आणि जिल्हा प्रशासनाकडून तोडगा काढण्यासाठी प्रत्येकवेळी हस्तक्षेप केला जातो. गेल्या वर्षी जहीराबाद आणि शेजारील विभागातील शेतकऱ्यंनी मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वाहनातून ऊस संगारेड्डी येथील गणपती शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडला गाळपास दिला होता. जहीराबादच्या शेतकऱ्यांच्या दबावामुळे ट्रायडंट शुगर्स सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित होतो. मात्र, याबाबत काहीच घडत नाही अशी स्थिती आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here