तेलंगणा: बंद साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

46

संगारेड्डी : गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी जहीराबादमध्ये आरडीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या हंगामात त्यांचा ऊस खरेदी केला जावा अशी मागणी त्यांनी केली. जहीराबाद परिसरातील एकमेव साखर कारखान्याचेगाळप बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेजारील निजामाबाद जिल्ह्यासोबतच कर्नाटकात ऊस विकावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी फक्त तीन ते चार लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा जवळपास १० ते १२ लाख टन उसाचे उत्पादन झाले असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऊस शेजारील राज्यात नेणे अवघड असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

याशिवाय, हंगाम सुरू झाल्यनंतर जहीराबादमधील स्थानिक साखर कारखान्याचे गाळप सुरू करण्याबाबत कोणतीच प्रक्रिया केली गेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱयांनी उपनगरातील जहीराबाद विभागातील आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली काढली. त्यामध्ये जहीराबाद परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. साखर कारखान्याच्या मालकांशी सरकारने तातडीने चर्चा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारने प्रयत्न केले नाहीत, तर आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनाला विविध विरोधी पक्ष, व्यापारी संघटनांचे पाठबळ मिळाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here