तेलंगणा: मुथ्यमपेट साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जगतीया : जिल्ह्यातील मेटपल्ली विभागातील मु्थ्यमपेट साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी रथू इक्या वेदिका संघटनेच्या नेतृ्त्वाखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी जगतीयाल जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. आणि मुथ्यमपेट साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

साखर कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी सांगितले की, टीआरएस पक्षाने निवडणुकीवेळी आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात सरकार कारखाना सुरू करेल अशी घोषणा करण्यात आली होती याची आठवण शेतकऱ्यांनी करून दिली. याबाबत शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडे पोहोचवू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here