तेलंगणा: निजाम शुगर्सच्या कामगारांचा प्रश्न सुटण्याची शक्यता

निजामाबाद : राज्य कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी निजाम डेक्कन शुगर्स लिमिटेडच्या (एनडीएसएल) कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्या मांडण्यास सांगितले आहे. चार महिन्यानंतर राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. या प्रश्नांवर श्रमिक संघाने पदयात्राही काढली होती. फेब्रुवारीत एनएसडीएलच्या कर्मचाऱ्यांनी बोधन ते हैदराबाद अशी पदयात्रा काढली होती. तेथे आपल्या मागण्या मांडून राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवेदने देण्यात आली होती.

कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागण्या ऐकून घेतल्यानंतर एनडीएसएल कर्मचारी संघाचे महासचिव एस. कुमारा स्वामी यांनी कामगार विभागाला पत्र लिहिले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन २०१६ पासून थकीत आहे. २५ कोटी रुपयांची देणी आहेत. कर्मचारी विविध अडचणींना तोंड देत असल्याचे पत्रात त्यांनी म्हटले आहे. आता कामगार विभागाने तपशील जमा करण्यास सुरुवात केली ही चांगली बाब असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सकारात्मक निर्णय घेऊ शकतात असे कामगारांचे म्हणणे आहे.

निजाम शुगर फॅक्टरीची स्थापना निजामांच्या कारकिर्दीत झाली होती. नंतर त्याचे विस्तारीकरण झाले. संयुक्त आंध्र प्रदेशात टीडीपीच्या सरकारच्या काळात याचे खासगीकरण करण्यात आले आणि त्याचे नाव एनडीएसएल ठेवण्यात आले. तेलंगणा राज्य निर्मितीनंतर २०१५ मध्ये प्रशासनाने कंपनी बंदची घोषणा केली होती. हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहे. एनडीएसएलच्या कर्मचाऱ्यांची संख्या १४० असल्याचे कुमारा स्वामी यांनी सांगितले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here