दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरसाठी इथेनॉलचा वापर करण्याचा आग्रह

नवी दिल्ली : जैव इथेनॉल, सीएनजी, एलएनजी अशा वैकल्पिक इंधनाच्या उत्पादन आणि व्यवसायाशी संलग्न संस्थांच्या प्राथमिक कर्ज सुविधेचा विस्तार करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, यातून इंधन आयातीमध्ये कपात करता येईल. या मुद्यावर मी अर्थ मंत्री आणि आरबीआयच्या गव्हर्नरांशी चर्चा करणार आहे. प्राथमिकता असलेल्या क्षेत्रामध्ये कर्ज सुविधा देणाऱ्या संस्थांसाठी सोप्या अटींवर बँकांकडून कर्ज मिळण्यास मदत अपेक्षित आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री गडकरी म्हणाले की, आयओसीकडून इथेनॉल कॅलरी मानांकन पेट्रोलच्या बरोबरीने आणण्याची चाचणी यशस्वी झाली आहे. पहिल्यांदा अशी चिंता होती की, एक लिटर पेट्रोलच्या तुलनेत एक लिटर इथेनॉलसोबत कमी किलोमीटरचा प्रवास करता येतील. आता हा मुद्दा सोडविण्यात आला आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन दूरसंचार कंपन्यांना आपल्या मोबाईल टॉवरशी संलग्न डिझेल आधारित जनरेटरऐवजी इथेनॉल आधारित जनरेटरवर चालविण्यासाठी आग्रह करण्याचे आवाहन केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here