महाराष्ट्रात अद्याप पावसाची शक्यता कायम आहे. राज्यातील विदर्भ क्षेत्रात ढगाळ वातावरण असे आणि उद्या पाऊस कोसळू शकतो असे अनुमान वर्तविण्यात आले आहे. याचा सर्वाधिक परिणाम नागपूरमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मुंबईसह इतर भागात आज हवामान स्वच्छ आहे. आगामी दिवसांतही अशीच स्थिती कायम राहील. यादरम्यान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यात कमाल तापमान ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उन्हाची तिव्रता वाढत जाईल.
मुंबईत आज कमाल तापमान ३४ तर किमान तापमान १८ अंश राहील अशी शक्यता आहे. हवामान साफ राहील. तर हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. पुण्यामध्ये कमाल ३५ आणि किमान १६ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. हवेची गुणवत्ता समाधानकारक आहे. नागपूरमध्ये कमाल ३४ आणि किमान १५ डिग्री सेल्सिअस तापमान असेल. येथे हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असून हवामान ढगाळ राहील. नाशिकमध्ये हवामान साफ राहील. मात्र, तापमान कमाल ३३ तर किमान १४ यांदरम्यान राहिल. औरंगाबादमध्ये कमाल ३५ आणि किमान १६ डिग्री सेल्सिअस तापमान असेल. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदविण्यात आली आहे.