पाकिस्तान ट्रेडिंग कॉर्पोरेशनकडून ५०,००० टन साखर खरेदीसाठी निविदा

पाकिस्तानमधील सरकारी संस्था ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने (टीपीए) ५०,००० टन पांढरी साखर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेसाठी प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत २ जून आहे.
पाकिस्तानमध्ये रमजानच्या महिन्यात ग्राहकांना साखरेच्या वाढत्या दरापासून काही दिवसांसाठी दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा साखरेचा दर चढाच आहेत. पाकिस्तान सरकारने देशातील साखरेचा तुटवडा कमी करण्यासाठी बाहेरुन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये नॅशनल अकाउंटेब्लिटी ब्युरोने (एनबीए) एका मोठ्या साखर घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. अनेक साखर कारखानदारांनी सरकारकडून अफगाणीस्तानला निर्यातीसाठी मंजूर झालेला साखरेचा कोटा परस्पर पाकिस्तानमध्येच विकल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here