मुंबईत ताडदेवमध्ये भयानक आग, विस मजली इमारतीमधील ७ जणांचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत भयानक आगीची घटना घडली आहे. मुंबईतील ताडदेवमध्ये भाटिया हॉस्पिटलजवळील २० मजल्यांच्या कमला बिल्डिंगमध्ये हा आगीचा प्रकार घडला. ही आग केवळ तिसऱ्या मजल्यावर लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी ५ अॅम्ब्युलन्स पोहोचल्या आहेत. आतापर्यंत १९ जणांना या आदगीपासून वाचविण्यात आले आहे.

या आगीच्या घटनेत जखमी झालेल्या ४ जणांना नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तर १५ जणांना भाटिया हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. भाटिया हॉस्पिटलमधील तिघांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर १२ जणांना किरकोळ भाजले आहे. त्यांच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here