थायलंडच्या साखर कारखान्यांवर दुष्काळाचे सावट

थायलंड : 2020-21 वर्षादरम्यान जर दुष्काळ पडला तर त्यांच्या उत्पादनावर पुन्हा एक वर्ष परिणाम होण्याच्या भितीचे सावट थायलंड च्या साखर कारखान्यांवर घोंघावते आहे. थाई शुगर मिलर्स कॉर्पोरेशन (टीएसएमसी) चे जनसंपर्क कार्यकारी समूहाचे अध्यक्ष सिरीवूत सीमपाकडी यांनी सांगितले की, शुगर इंडस्ट्रि सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे आणि तसेच दुष्काळाच्या स्थितीसाठीही आता सज्ज व्हायचे आहे.

टीएसएमसी यांच्या मतानुसार गेल्या वर्षी 2019-20 च्या हंगामात 74.9 मिलियन टन ऊसापासून 8.27 मिलियन टन साखरेचे उत्पादन झाले होते.
सिरीवूत यांनी सांगितले की, गेल्या वर्षी दुष्काळाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर साखर उद्योगावर परिणाम केला होता. यामुळे जागतिक स्तरावर साखरेच्या किमतीमध्ये 15 अमेरिकी सेंट प्रति पाउंड इतकी वृद्धी झाली. पण या वर्षी ब्राजीलची साखर निर्यात वाढवण्याची योजना आहे. आमचे यावर लक्ष आहे. यामुळे इथल्या साखर किमतीत घट होईल का हे आम्ही पाहणार आहोत. आम्हीही इथेनॉल उत्पादनाकडे वळणार आहोत. पण कोरोनाच्या फैलावामुळे तेलाची मागणी कमी झाली आहे. थायलंड च्या ऊस आणि साखर उद्योगावर याचा परिणाम होईल.

थायलंड ब्राजीलनंतर जगातील चौथा सर्वात मोठा साखर उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातक देश आहे. सिरीवूत यांनी सांगितले की, थायलंड मध्ये साखर कारखाने ऊस उशेतकर्‍यांना पाण्यासाठी तलावाच्या निर्माणात मदत करणार आहेत. जेणेकरुन दुष्काळा दरम्यान त्यांना कोणतीही अडचण येवू नये.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here