थायलंडचे साखर उत्पादन तीन वर्षाच्या उच्चांकी स्तरावर

बँकाक : चांगल्या पीक उत्पादनामुळे थायलंडमधील साखर उत्पादन दोन वर्षानंतर उच्चांकी स्तराच्या दिशेने वाढत आहे. थाई शुगर मिल्स कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च रोजी सध्याच्या गळीत हंगामाच्या अखेरपर्यंत १० मिलियन टनापर्यंत साखर उत्पादन पोहोचू शकेल. कारखान्यांनी ७ डिसेंबर रोजी हंगाम सुरू केला. त्यानंतर आतापर्यंत ८७.७५ मिलियन टन ऊसाचे गाळप करुन ९.६ मिलियन टन साखर उत्पादन केले आहे.

थाई शुगर मिलर्स कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, ऊस पिकाचे उत्पादन ९० मिलियन टन होऊ शकते. गेल्या हंगामातील ६६.७ मिलियन टनाच्या तुलनेत ते ३५ टक्क्यांनी अधिक आहे. थाई शुगर मिलर्स कॉर्पोरेशनचे सिरिवुथी सियाम्फकडी यांनी सांगितले की, थायलंड एकूण साखर उत्पादनाच्या ७० टक्के साखर निर्यात करते. उर्वरीत साखर देशांतर्गत स्तरावर वापरली जाऊ शकते. सिरिवुथी यांनी सांगितले की, समुहाला २०२२-२३ या हंगामात ऊस आणि साखर उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

ऊस पिकावरील खर्चात खास करुन तेल, खते आणि मालाच्या चढणी-उतरणी दरात वाढ झाली आहे. सिरुवुथी यांनी सांगितले की, वाढत्या खर्चामुळे थालयंडमधील शेतकरी चिंतेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here