थानाभवन साखर कारखाना सर्वप्रथम हंगाम सुरू करणार

86

शामली : जिल्ह्यातील बजाज समुहाची थानाभवन साखर कारखाना सर्वात आधी ऊस गाळप सुरू करणार आहे. सात नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता विधीवत पूजन करून गाळप हंगामाला सुरुवात होईल.

थानाभवन कारखान्याचे वरिष्ठ ऊस महाप्रबंधक जे. बी. तोमर यांनी सांगितले की, सहा नोव्हेंबरसाठी खरेद्री केंद्रांना २१ हजार क्विंट, सात नोव्हेंबर रोजी गेट आणि खरदे केंद्रांना ६५००० क्विंटल, आठ नोव्हेंबर रोजी गेट आणि खरेदी केंद्रांना एक लाख ८२ हजार क्विंटल उसाचे इंडेंट देण्यात आले आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, शामली साखर कारखाना आठ नोव्हेंबर आणि ऊन साखर कारखाना दहा नोव्हेंबर रोजी पूजन करून आपला गाळप हंगाम सुरू करणार आहे. दुसरीकडे शामली कारखान्याचे सहाय्यक ऊस महाप्रबंधक दीपक राणा यांनी सांगितले की, कारखाना आठ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. शामली कारखान्याने बुधवारी उसाचे इंडेंट जारी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here