ठाणाभवन साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन

शामली : जिल्ह्यातील शामली साखर कारखान्यानंतर आता बजाज समूहाच्या ठाणेभवन साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी बजाज समूहाच्या ठाणाभवन साखर कारखान्याचे बॉयलर पूजन विधिवत संपन्न झाले. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कारखाना ऊस गाळप हंगाम सुरू करणार आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सकाळी ठाणाभवन साखर कारखान्याच्या बॉयलर हाऊसमध्ये पंडित राजकमल शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी पूजाविधी केले. यानंतर बॉयलरमध्ये अग्नीप्रदीपन करण्यात आली. यावेळी ठाणाभवनचे युनिट हेड जे. बी. सिंग, ऊस विभागाचे महाव्यवस्थापक अभिषेक श्रीवास्तव, अभियंता प्रमुख अनुपम खरे, उत्पादन प्रमुख आमोद बिश्नोई, एचआर प्रमुख शिवचरण पांचाळ, वरिष्ठ ऊस व्यवस्थापक दुर्गेश तोमर, सतीशकुमार पुंडीर, राजेश कुमार आदी उपस्थित होते. साखर कारखान्याचे युनिट हेड जे. बी. सिंग म्हणाले की, कारखान्याचा नवीन गाळप हंगाम ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल.

ऊन साखर कारखान्याचे युनिट हेड अवनीश कुमार चौधरी यांनी सांगितले की, २० ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता ऊन कारखान्याचे बॉयलर पूजन कार्यक्रम होणार आहे. कारखान्याचा नवीन ऊस गाळप हंगाम ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here