साखर कारखान्यांच्या २०२२-२३ गळीत हंगामाची ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात

मेरठ : मेरठचे जिल्हाधिकारी दीपक मिणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत गळीत हंगाम २०२२-२३ वेळेवर सुरू करावा आणि ऑक्टोबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत हंगामाला सुरुवात करावी असे निर्देश संबंधीत घटकांना दिले. जिल्हाधिकारी दीपक मिणा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक झाली. यावेळी थकीत ऊस बिले तातडीने देण्याबाबतही निर्देश देण्यात आले. या बैठकीला मवाना, दौराला, सकौती टांडा, मोहिउद्दीनपुर, किनौनी आणि नंगलामल या कारखान्यांचे अध्यक्ष, युनिट प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आतापर्यंतचा आढावा घेऊन मवाना, किनौनी, मोहिउद्दनीपुर या तीन कारखान्यांना तत्काळ ऊस बिले देण्याचे निर्देश देण्यात आले. पत्रिकामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दौराला साखर कारखाना, सकौती टांडा आणि नंगलामल या कारखान्यांनी गळीत हंगाम २०२१-२२ मधील सर्व ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. ऑक्टोबरपूर्वी कारखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीची कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत असे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांसह सर्व कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, युनिट प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here