देशात सरासरी 880 मिलिमीटर पावसाची नोंद

पुणे: यंदा देशात 4 महिन्यात मिळून सरासरी 880 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. तसेच दिर्घकालीन सरासरीच्या 110 टक्के पावसाची नोंद झाली आहे. अर्थातच, देशाच्या 81 टक्के भागात यंदा समाधानकारक पाउस पडला आहे. यंदा देशात सरासरीएवढा (96 ते 104 टक्के) पाउस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र हा अंदाज चुकला असल्याचे दिसून आले.

दि. 1 जून ते 30 सप्ेटंबरदरम्यानच्या हंगामात 36 पैकी तब्बल 29 उपविभागांमध्ये दमदार पाउस पडला, तर 7 उपविभागांमध्ये अल्प पावसाची नोंद करण्यात आली. 18 उपविभागांमध्ये सरासरीएवढा, तर 11 उपविभागांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात देशात नोंद होण्याएवढा पाउस पडलाच नाही. मात्र, जुलै महिन्यात देशात सरासरीच्या 105 टक्के, ऑगस्टमध्ये 115 टक्के, सप्ेटंबरमध्ये 152 टक्के पावसाची नोंद झाली. सन 1931 नंतर यंदा प्रथमच जूनमधील पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही दिर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक पाउस नोंदवल्याची माहिती हवामान खात्यातील सूत्रांनी दिली.

एकंदरीतच देशात सरासरीपेक्षा 6 टक्के कमी व ईशान्य आणि पूर्व भारतात मिळून 16 टक्के कमी पाउस पडला. महाराष्ट्रात 32 टक्के अधिक पाउस पडला असून, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 57 टक्के अधिक, कोकणात 54 टक्के अधिक आणि विदर्भात 9 टक्के अधिक पाउस पडला. पण मराठवाड्यात मात्र सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, राज्यातून मान्सून 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान माघारी परतेल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. तर राजस्थानातून 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मान्सून काढता पाय घेईल, असा सुधारित अंदाज वर्तवला आहे. गेल्या 24 तासात कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर उर्वरीत राज्यातील हवामान कोरडे होते, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here