30 वर्षांपासून बंद पडला होता बनमनखा साखर कारखाना, आता पुन्हा सुरु होण्याची आशा

पूर्णिया : 30 वर्षांपूर्वी बंद झालेला एशियातील सर्वात प्रसिद्ध बनमनखी साखर कारखाना पुन्हा चालू होण्याची कुजबुज जोरात सुरु झाली आहे. यामुळे या परिसरातील लाखो लोकांमध्ये आशेचा किरण जागा झाला आहे. कंपनीचे मालक इथे साखरेबरोबरच इथेनॉल आणि विज निर्मिती करण्याबाबतही बोलत आहेत. जर्जर झालेल्या या कारखान्याच्या चालू होण्यामुळे या पसिरातील लाखो शेतकर्‍यांसह हजारो कामगारांना रोजगार मिळू शकतो. सोमवारी मंत्री बीमा भारती, पर्यटन मंत्री कृष्ण ऋषी आणि अधिकार्‍यांच्या पथकाने मुंबईतील एका कंपनीबरोबर बनमनखी साखर कारखान्याचा सर्वे केला.

कंपनीचे मालक लाल बहादुर प्रसाद म्हणाले, त्यांना ही जागा पसंत आहे. जर सरकारने लवकर या जमिनीचे वाटप केले तर ते इथे एका वर्षाच्या आत फैक्ट्री सुरु करतील. इथे प्रतिदिनपाच हजार मेट्रीक टन साखरेच्या उत्पादनाबरोबर तीस मेगावॅट विज आणि 60 कीलोलीटर इथेनॉलचे उत्पादन होईल. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडून सरकारला प्रस्ताव देण्यात आला आहे. सरकारने जमीन वाटप केल्यास आम्ही अ‍ॅग्रीमेंट करुन लगेचच इथे काम सुरु करु.

इकडे, ऊस उद्योग विकास मंत्री बीमा भारती म्हणाले, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. मुंबई च्या रेहाजा अ‍ॅन्ड प्रसाद कंपनीकडून इथे साखर कारखाना सुरु करण्याचा प्रस्ताव आला आहे. आम्ही परिसराची तपासणी केली आहे. जमीन संदर्भातील अडचण दूर करुन लवकरच जमीन त्यांना दिली जाईल. कदाचित जुलैमध्ये साखर कारखान्यासाठी जमिनीचे पूजन होण्याची शक्यता आहे. मंत्री म्हणाले, इथे साखर कारखाना सुरु झाल्यास या परिसरातील हजारो लोकांना रोजगार मिळेल. लोकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही. इथे साखर कारखाना सुरु झाल्याने इथल्या लाखो शेतकर्‍यांनाही फायदा होणार आहे.

बनमनखी आमदार कृष्ण कुमार ऋषी म्हणाले, बनमनखी साखर कारखाना सुरु करणे हे माझे स्वप्न होते. उस उद्योग मंत्री यांच्या बरोबर वियाडा आणि उस विकास विभागाच्या अधिकार्‍यांसह कंपनीचे मालकही इथे आले आहेत. बनमनखी साखर कारखान्याची 118 एकर जमीन अलीकडेच वियाडा ला देण्यात आली होती. आता रेहाजा अ‍ॅन्ड प्रसाद कंपनी इथे साखर कारखाना सुरु करण्यासाठी इच्छुक आहे.त्यांना लवकरच जमीन दिली जाईल. 2021 मध्ये बनमनखी मध्ये पुन्हा साखर कारखान्यासह इथेनॉल आणि विज उत्पादन सुरु होण्याची शक्यता आहे.

1967 ते 1990 पर्यंत बनमनखी साखर कारखाना सुरु होता. अनेक कारणांमुळे हा कारखाना बंद झाला ज्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले होते. बनमनखी कारखाना सुरुवातीपासून सर्वच पक्षांसाठी निवडणुकीचा मुद्दा बनला होता. यावेळी निवडणुकीवेळी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्याची कुजबुज सुरु झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here