श्री श्री साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

सांगली : सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लि. श्रीनगर राजेवाडी (ता. आटपाडी) या कारखान्याचा १२वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व सुदर्शन होम चेअरमन एन. शेषागिरीराव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्हा. चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील प्रमुख उपस्थित होते. बाळासाहेब पाटील म्हणाले की, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांचा कारखान्याने विश्वास संपादन केला आहे. सद्गुरु श्री श्री रविशंकर तथा गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने सेवा निसर्गाची उन्नती आपली या ध्येयाने प्रेरित होऊन कारखान्याची वाटचाल सुरू आहे.

बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमाला व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव, संचालक मोहन बागल, उषाताई मारकड, सरव्यवस्थापक रामराव रेड्डी प्रमुख उपस्थित होते. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कांतीलाल नाईकनवरे, बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, कृष्णा पुजारी, प्रमोद बागल, कैलास शिरकांडे, श्यामतात्या मदने, कृष्णांत मदने- पाटील, सरपंच कृष्णा सावंत, राणी गोरड, ज्योतीराम अवताडे यांच्यासह माळशिरस, पंढरपूर, आटपाडी, माण, सांगोला तालुक्यातील पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here