बजेट अधिवेशन ३१ जानेवारीपासून, दोन टप्प्यात होणार अधिवेशन

19

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरू होणार आहे. ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या संयुकत सत्रात भाषण करतील. तर एक फेब्रुवारी रोजी सरकारकडून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

याबाबत सूत्रांनी सांगितले की, ऑम्रीकॉन व्हेरियंटचा वाढता धोका पाहता यावेळी दोन सत्रामध्ये अधिवेशन होणार आहे. पहिले सत्र ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी असे राहील. तर दुसरे सत्र १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये गेल्या महिनाभरात संसद भवनातील ७१८ कर्मचारी संक्रमीत झाले आहेत. यापैकी बहुसंख्य कर्मचारी गेल्या दोन आठवड्यात संक्रमित झाले आहेत. ९ जानेवारीपर्यंत ४०० कर्मचारी संक्रमित झाले आहेत. तर बुधवारी हा आकडा ७०० वर पोहोचला. तर राज्यसभा सचिवालयातील सुत्रांनी सांगितले की, संक्रमित कर्मचाऱ्यांपैकी २०० कर्मचारी राज्यसभेतील आहेत. उर्वरीत लोकसभा तसेच इतर विभागातील आहेत. लोकसभा आणि राज्यसभेने आपल्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास मंजुरी दिली आहे. तर ५० टक्के अधिकाऱ्यांनी घरातून काम करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here