लुटलेल्या साखर ट्रकचा खरेदीदार ताब्यात

सोनीपत : सीआयए स्टाफ सोनीपत यांनी लुटल्या गेलेल्या साखरेचा ट्रक खरेदी करणार्‍या खरेदीदाराला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी गोपाल निवासी चड्डा संगरुर येथील आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात सादर करुन तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणात 5 आरोपींना यापूर्वीच ताब्यात घेतले आहे.

जयपूर राजस्थान निवासी रामेश्‍वर ने 14 फेब्रुवारी ला राई ठाण्यात पोलिसांत तक्रार देवून सांगितले की, साखरेने भरलेला ट्रक अज्ञान लोकांनी लुटला होता. ते आपल्या गाडीने चौधरी ट्रान्सपोर्ट कंपनी चांदपूर शुगर मिल बिजनौर पासून 700 पोती साखर घेवून नारनौल कडे चालला होता. गौरीपूर यूपी येथून हरियाणा बॉर्डर कडून येत होता. त्याच दरम्यान, कारमधील पाच अज्ञातांनी हत्याराचा धाक दाखवून ट्रक लुटला. सीआयई टीम ने पाच आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून साखरेची 164 पोती व 2 लाख रोख व घटनेत वापरेलेले हत्यार जप्त केले. तपास अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितले की, ट्रक खरेदी करणार्‍या आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here