अती उच्च वाहिनीमुळे ऊस जळाला

83

बिजनौर : अति उच्च दाबाच्या वीज वाहिनीतून उडालेली ठिणगी ऊसाच्या शेतात पडली. त्यामुळे परिसरातील चार एकरातील ऊस जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी शहर पोलिस ठाण्याजवळील मंडावली येथील शेतकरी मदनपाल सिंह यांच्या शेताजवळून गेलेल्या अति उच्च दाबाच्या वीज वाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे उडालेली ठिणगी उसाच्या शेतात पडली. त्यातून आग लागून चार एकर ऊस जळून खाक झाला. यापूर्वीही अशाच प्रकारे आग लागून नुकसान झाल्याचे शेतकरी मदनपाल यांनी सांगितले. वीज विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्ती केली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here