साखर विभागाच्या कारखान्यात विकल्या गेलेल्या साखरेची कागदपत्रे सीबीआय ने मागितली

711

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मायवती सरकारच्या कालावधीत झालेल्या साखर घोटाळ्यावरुन सीबीआय ने पुन्हा कंबर कसली आहे. सीबीआय ने उत्तर प्रदेश सहकारी साखर निगम ला पत्र पाठवून या संदर्भात असणारी सर्व कागदपत्रे दाखवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतीत सीबीआय ने टेंडर संबंधीत असणारे दस्तऐवज, ज्यात किती लोकांनी निविदा पाठवल्या आणि कुणाची सगळ्यात कमी होती, कुठल्या आधारवर या कारखान्यांना विकलं गेलं, इतकच नाही तर या व्यवहाराशी जोडल्या गेलेल्या सर्व कॅबिनेट निर्णयांचीही मागणी केली आहे. ज्यामुळे या प्रकरणाच्या तळाशी जाता येईल. ज्या कंपन्यांना या मिल विकल्या गेल्या त्यांची बॅकग्राउंड काय आहे याचा तपासही सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश साखर निगम लिमिटेड अंतर्गत 10 चालू आणि 11 बंद साखर मिल्सची विक्री 2010-11 मध्ये झाली होती. यामध्ये देवरिया, बरेली, लक्ष्मीगंज आणि हरदोई इथे असणार्‍या मिल खरेदी करण्यासाठी नम्रता मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटे कंपनी किंवा रामकोला, छितौनी व बाराबंकी खरेदी करण्यासाठी गिरीयांशो कंपनी ने दावा ठोकला होता.

दोन्ही कंपनीच्या निर्देशकांनी वर्ष 2008-09 ची बॅलेन्सशीट लावली. निगमचे प्रधान प्रबंधक एस.के. मेहरा यांनी नम्रता मार्केटिंग कंपनी चे निर्देशक व दिल्लीच्या रोहणी सेक्टर 16 निवासी राकेश शर्मा, गाजियाबदच्या इंदिरापुरम मध्ये राहणारे धमेंद्र गुप्ता, सहारनपूर साउथ सिटी निवासी सौभर मुकुंद आणि सहारनपुर येथील मिर्जापूर पोल 3 मध्ये राहणारे जावेत तथा गिरियाशो कंपनीचे दिल्ली येथे राहणारे राकेश शर्मा यांची पत्नी सुमन शर्मा, गाजियाबादचे इंदिरापुरम निवाही धमेंद्र गुप्ता, सहारनपुर च्या मिर्जापूर निवासी नसीम व वाजिद अली यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.

नम्रता मार्केटिग कंपनीच्या वतीने उपलब्ध केल्या गेलेल्या प्रमाणपत्रांमध्ये सौरभ मुकुंद आणि मोहम्मद जावेद तथा गिरीयाशो कंपनी तर्फे देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांमध्ये नसीम व वाजिद यांना निर्देशक म्हणून सांगण्यात आले आहे. प्रमापत्रांबरोबरच असणार्‍या बॅलेन्सशीटवर राकेश शर्मा व डी.के. गुप्ता यांच्या सह्या आहेत. याप्रमाणे गिरियाशो कंपनीच्या बॅलेन्स शीट मध्ये निर्देशक डी.के. गुप्ता व सुमन शर्मा यांच्या सह्या आहेत. तपासणी वेळी नम्रता मार्केटिंग कंपनी च्या निर्देशकांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी गंभीर अन्वेषण विभाग च्या टीमला साक्ष देताना सांगितले की, कंपन्या फक्त कागदोपत्री आहेत. त्यांच्यात कुणाचेही नाव किंवा शेअर नाही. त्यांनी कुठल्याही कागदावर सह्या केलेल्या नाहीत. जे काही केलं ते दोन्ही कंपन्यांचे मालक सुरेश कुमार गुप्ता यांच्या सांगण्यावर केलं. दोन्ही कंपन्यांची दिल्लीमध्ये जी कार्यालये दाखवली गेली होती ती त्यांची स्वत:ची होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here