केंद्र सरकारकडून आतापर्यंत १८०० कोटी रुपयांचे साखर निर्यात अनुदान मंजूर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०२०-२१ या हंगामात सहा मिलियन टन साखर निर्यातीसाठी आतापर्यंत साखर कारखान्यांना १८०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. सरकारने गेल्या तीन सत्रांमध्ये साखरेचा अतिरिक्त साठा कमी करणे आणि आर्थिक तरलतेच्या अडचणींशी तोंड देणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे देण्यासाठी मदत म्हणून निर्यात अनुदान दिले होते.

याबाबत Livemint.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, खाद्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला याबाबत माहिती दिली. चालू हंगामात निर्यात अनुदानासाठी ३५०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यापैकी १८०० कोटी रुपयांच्या अनुदानाच्या प्रकरणांवरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरीत मंजूर अनुदानही लवकरात लवकर साखर कारखान्यांना दिले जाईल. अर्थ मंत्रालयाकडून लवकरच यासाठीचा निधी मिळेल असे अहवालात म्हटले आहे.

साखर कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामासाठी मंजूर केलेल्या ६० लाख टनाच्या कोट्यातील साखर निर्यात आधीच पूर्ण केली आहे. कारखान्यांनी जागतिक स्तरावरील चांगल्या स्थितीचा फायदा घेत अनुदानाशिवायही साखर निर्यात केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here