केंद्र सरकार आज एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढ जाहीर करण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकार आज (28 जून) कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी वाढीची मोठी भेट देण्याची शक्यता आहे. सीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, एफआरपी वाढीचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळ आणि सीसीईएची आज बैठक होणार असून, या बैठकीत ऊस खरेदी दरात (FRP) वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकार उसाचा भाव 305 रुपये प्रति क्विंटल वरून 315 रुपये करू शकते. ही दरवाढ 10.25% रिकव्हरीला लागू होणार आहे.

नवीन किमतीनुसार, जेव्हा रिकव्हरी 0.1% ने वाढेल, तेव्हा एफआरपी प्रती क्विंटल 3.07 रुपये वाढू शकते. संभाव्य नवी दरवाढ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी लागू होईल. त्याचबरोबर या बैठकीत PM PRANAM (प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर एग्रीकल्चर मैनेजमेंट) योजनेलाही मान्यता मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here