केंद्र सरकार आगामी हंगामात साखरेवरील निर्यात अनुदान बंद करण्याची शक्यता

218

जागतिक दरातील तेजीमुळे भारतात आगामी गळीत हंगामात साखर निर्यातीवरील अनुदान बंद केले जाऊ शकते. रॉयटर्स वृत्तसंस्थेत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगतले की, भारतात ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात साखर निर्यात अनुदान बंद केले जाऊ शकते. जागतिक स्तरावरील तेजीमुळे भारतीय कारखान्यांना जागतिक बाजारपेठेत साखर विक्री सुलभ झाली आहे.

रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सुधांशू पांडे यांनी सांगितले की, सरकार अद्याप पुढील वर्षीच्या अनुदानाचा विचार करीत नाही. सध्याची स्थिती पाहता आगामी काळात अनुदानाची गरज भासेल असे वाटत नाही. जर निर्यात स्वतःहून सुरू ठेवता येत असेल तर जागतिक बाजारासाठीही ते खूप चांगले ठरेल.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्यात अनुदानाबद्दल अनेक देशांनी जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) दरवाजा ठोठावला होता. अद्याप हे प्रकरण सुरू आहे. भारतीय साखर उद्योग गेल्या काही वर्षांपासून अडचणींतून जात आहे. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. सरकारने साखर उद्योगाला दिलेली मदत डब्ल्यूएचओच्या निकषानुसार असल्याचे म्हटले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here